महात्मा गांधींची आठवण काढायला नथुराम गोडसे आज पुन्हा येतोय..!!

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेल्या आणि नुकत्याच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बऱ्या झालेल्या शरद पोंक्षे यांची माध्यमविश्वात पुन्हा नव्याने एंट्री होत आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ‘माझा कट्टा’ या विशेष उपक्रमात ते दर्शकांशी दिलखुलास गप्पा मारताना दिसतील.

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारविरुद्ध नाराजी; भ्रष्टाचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

चालू सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा कमी होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पोस्टिंग न मिळणे, परीक्षा घेणाऱ्या वेबसाईटमध्ये त्रुटी असणे या मूलभूत अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांना याप्रश्नी न्याय मिळाला नाही.

‘ई-सिगारेट’चा वापर केल्यास सहा महिन्यांपर्यंत कैद – केंद्र सरकार

इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई-सिगारेट) प्रतिबंध कायद्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केला असून ई-सिगारेट बाळगल्यास किंवा वापर केल्यास सहा महिन्यांपर्यंत कैद आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा यामध्ये प्रस्तावित केली आहे. हा मसुदा सरकारने हरकती आणि सूचनांसाठी शुक्रवारी खुला केला आहे. केंद्र सरकारने १८ सप्टेंबर रोजी ई-सिगारेटवर अध्यादेश काढून बंदी आणली. त्यानंतर आता ई-सिगारेट प्रतिबंध कायदा प्रस्तावित करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठीचा मसुदा तयार केला असून केंद्रीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

‘द स्काय इज पिंक’ – नात्यांची वीण घट्ट करणारा वास्तव प्रवास

कुटुंबातील व्यक्ती आजारपणातून पुढं जात असताना गरजेचं असतं ते एकमेकांना सावरण, आधार देणं आणि समजून घेणं. खऱ्या आयुष्यातील निरेन चौधरी आणि कुटुंबाची ही कथा नक्कीच प्रेरणादायी आहे.

ज्योतिरादित्य सिंदिया भाजपात? फ्लेक्सवर फोटो झळकल्याने काँग्रेस गोटात खळबळ

मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या भाजप प्रवेशातील चर्चांना उधाण आले आहे. स्वपक्षीयांना टोकल्याबद्दल काही कार्यकर्त्यांमध्ये सिंदिया यांच्याविषयी नाराजी आहे. मध्य प्रदेश सरकारने केलेल्या सरसकट कर्जमाफीला सिंदिया यांनी विरोध दर्शवला होता. दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी ठीक राहील असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

मोदींनी चीनला ५६ इंच छाती दाखवावी – कपिल सिब्बल

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कलम ३७०च्या मुद्द्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थन केले आहे. मोदी यांनी शी यांना ५६ इंच छाती दाखवावी आणि त्यांच्या नजरेला नजर भिडवून काश्मीरमधील पाच हजार किलोमीटरचा परिसर सोडायला सांगावा, असं आव्हान सिब्बल यांनी दिलं.

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू कॅथरीन ब्रँट आणि नॅट स्किवर विवाहबंधनात; नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

विश्वचषक विजेत्या इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील कॅथरीन ब्रँट आणि नॅट स्किवर यांनी शुक्रवारी आपण लग्न केल्याचं जाहीर केलं.

‘मोदीजी को भगवान मानते थे…हम डूब गए’; मदतीसाठी रडणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

मोदींच्या कटआउट्चे पाय धरून मदतीची याचना करताना ही महिला, ‘विदेशात जाऊन तुम्ही मदत करता. आमचंही भलं करा. आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत. भीक मागायची वेळ आली आहे. आमचा पैसा मिळवून द्या.’ असं म्हणत आहे.

५० रेल्वे स्थानके, १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार

रेल्वे क्षेत्रातील खासगीकरणाला नीती आयोगाने गती दिली असून देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. ही प्रक्रिया नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सचिव स्तरावरील उच्चाधिकार समिती पार पाडेल, असा निर्णय रेल्वे मंडळाने गुरुवारी घेतला.

राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.