हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये नवी मुंबईच्या कोपर खैरणेमधील हॉटेलमध्ये एका टेबलवर दोन व्यक्ती तर बाजूच्या टेबलवर 12 जण जेवण करण्यासाठी बसले होते. त्यातील 12 जणांच्या टोळीमधील एकाला फोन आला, त्यावेळी त्यांनी मोठ्याने बोलणे आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली. यानंतर त्यांच्या या मोठमोठयाने बोलण्यावर बाकी दोघांनी आक्षेप घेतला. यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला कि बारा जणांनी दोघांवर जीवघेणा हल्ला (fatally attacked) केला.
या 12 जणांच्या टोळीने हॉटेल मधील खुर्च्या,जेवणाच्या प्लेट,आणि बीयरच्या बाटल्यांनी दोघांवर हल्ला करत त्यांना जबर मारहाण (fatally attacked) केली. ही मारहाण सुरू असताना 12 जणांपैकी काहींनी फिर्यादी दोघांच्या गळ्यातील चैन आणि मोबाईल लंपास केला. या सर्व 12 आरोपींवर 395, 397 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हि संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
फोनवर मोठ्याने बोलल्याच्या कारणावरून दोघांवर जिवघेणा हल्ला, Video आला समोर pic.twitter.com/zEQBEOwxn6
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) November 28, 2022
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला. नवी मुंबईच्या कोपर खैरणेमधील हॉटेलमध्ये एका टेबलवर दोन व्यक्ती तर बाजूच्या टेबलवर 12 जण जेवण करण्यासाठी बसले होते. त्यातील 12 जणांच्या टोळीमधील एकाला फोन आला, त्यावेळी त्यांनी मोठ्याने बोलणे आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी बाजूला बसलेल्या दोघांनी मोठ्याने आणि शिवीगाळ करण्यावर आक्षेप घेत, त्यांना हटकले. याचा राग आल्याने 12 जणांच्या टोळीने त्या दोघांवर जीवघेणा हल्ला (fatally attacked) केला.