“मी कधीही धारधार चाकुने वार करुन..”, नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकिय वर्तुळातील नेत्यांना धमकीचे फोन येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. आता खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आपल्याला धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. तसेच याबाबत लवकर कारवाई करून आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. मात्र अद्याप त्यांना आलेल्या फोनबाबत कोणतेही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

नवनीत राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांना 088055 41949 संपर्क नंबरवरून विठ्ठल राव नामक व्यक्तीचा फोन येत आहे. या व्यक्तीकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तु गर्दीच्या ठिकाणी जाते ना त्या ठिकाणी मी कधीही धारधार चाकुने वार करेल ते तुला माहितीही पडणार नाही’ अशी थेट धमकी राणा यांना मिळाली आहे. ज्यावेळी धमकीदाराने फोनवर अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप देखील नवनीत राणा यांनी लावला आहे.

याप्रकरणी आता नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल दाखल केली असून आरोपीवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, यापूर्वी रवी राणा यांना देखील जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. तर गेल्या सहा दिवसांपूर्वीच, काँग्रेस नेते नीरज शर्मा यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. यातूनच या राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमकीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.