अमरावती | अनलॉक नंतर कोरोनाचा विस्फोट होणार देशातील पाहिलं शहर म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता लॉकडाउन करण्यात आला. मात्र जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला लॉकडाउन हा फोल ठरला आहे असा आरोप खासदार नवणीत राणा यांनी केला आहे.
मंगळवारी 972 म्हणजे आतापर्यंतची लॉकडाउन असताना रुग्णसंख्या आढळली आहे. या लॉकडाउनमुळे अनेक सामान्य लोकांच्या हाताला काम नाही. त्यातही महावितरणचे कर्मचारी विजतोडणी करताहेत. लॉकडाऊन मध्ये काम नसतांना सामान्य नागरिकांनी वीजबिल भरायचं कुठून असा प्रश्न अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला.
दरम्यान ज्या प्रमाणे एक दिवसात लॉक डाउन करण्याचा निर्णय पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला तसाच त्यांनी वीजबिल माफ करण्यात संदर्भातही घ्यावा असंही राणा यांनी यावेळी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.