व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विधानपरिषदेच्या मतदानासाठी नवाब मलिक, देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव; याचिका केली दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्यानिवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून आमदार फुटू नये म्हणून तिन्ही पक्षांनी विशेष काळजी घेतली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान करण्यासाठी सर्व आमदार मुंबईत हजर झाले आहेत. निवडणुकीत मतदान करण्यास मिळवावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत यावर सुनावणी पार पडणार आहे.

राष्ट्रवादीकडून आपल्या सर्व आमदारांनी मतदान करावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान त्यांचे दोन नेते सध्या टीकेत असल्यामुळे त्याच्याकडून मतदान करून घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखली आहे. दरम्यान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्याकडून राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मात्र, ती फेटाळण्यात आली. त्यांच्या सोबतच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही मतदानाचा हक्क नाकारला होता. दरम्यान, या दोघांनीही आताच सर्वोच्च न्यायालयात मतदान करण्यास मिळावे, अशी मागणी करत याचिका दाखल केली आहे. आता न्यायालयाकडून त्यांच्या याचिकेवर काय निर्णय दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.