नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांना पुरावे देणार; फडणवीसांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ड्रगचा खेळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू असून फडणवीस हेच ड्रगच्या उलाढालीचे मास्टरमाईंड आहेत असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मालिकांना प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नवाब मलिक हे सध्या कोणत्या मानसिकतेत आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी जो फोटो शेअर केला आहे तो 4 वर्षांपूर्वीचा आहे. कालच रिव्हर मार्चच्या लोकांनी त्यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता. त्या माणसाने सर्वांसोबत फोटो काढले असे फडणवीसांनी म्हंटल. फोटो काढला तर ड्रग कनेक्शन असत तर तुमच्या घरातच ड्रग आहे असा पलटवार फडणवीसांनी केला.

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्याबाबतचे पुरावे आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार आहोत. आता फक्त दिवाळी संपण्याची वाट पहा. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले-

राज्यातील ड्रगचा खेळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू असून फडणवीस हेच ड्रगच्या उलाढालीचे मास्टरमाईंड आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणाचे फडणवीस यांच्याशी संबंध आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा फायनान्सर जयदीप राणा हा पेडलर आहे. फडणवीस आणि ड्रग याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी नवाब मलिक यांनी म्हंटल.

Leave a Comment