हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने वाईनला सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भाजपकडून राज्य सरकावर निशाणा साधला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली. “भाजपा नेत्यांची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे. दारू बंद करण्याबाबत ते बोलत आहेत. मात्र, सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपात आहेत. आजपासून आम्ही दारु पिणार नाही, अशी शपथ भाजपाच्या नेत्यांनी घ्यावी,” अशी मागणी मलिक यांनी केली.
नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “वाइन विक्रीचा निर्णय सरकारने मागील आठवड्यामध्ये घेतला. हिमाचल, गोवा सरकारने देखील हाच निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात वाइन विक्रीच्या निर्णयाचा विरोध केला जात आहार. आणि तो कोण करतोय तर भाजपा. विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांचेच दारु निर्मितीचे कारखाने आहेत. त्याचे परवाने भाजपाचे नेते सरेंडर करणार का?अनेक नेत्यांची वाइन विक्री आणि मद्यविक्रीची दुकाने देखील आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपमधील काही लोकांचे बार आहेत. सर्वात जास्त दारू पिणारे लोक हे भाजपात आहेत. त्यांची तर एक नेता सांगतेय की थोडी थोडी पित जा. भाजपमधील नेत्यांनी आता सांगावे कि आजपासून आम्ही दारु पिणार नाही तशी त्यांनी शपथ घ्यावी, असे मलिक यांनी म्हंटले.