हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर गेले नाहीत अस विधान करत निशाणा साधला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्युत्तर दिलं आहे. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्वच कळते असं नाही, असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे.
अजित पवार सोमवारी साताऱ्यात होते. यावेळी त्यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचा आढावा बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मराठवाडा भागात अद्याप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाहणी करायला गेले नाहीत असं विरोधक म्हणत आहेत. पण पाहणी केली म्हणजे सर्व कळतंच असं नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत. आजही ते गेले आहेत. मंत्रालयात बसून व्हीसी घेऊन सर्वांशी संपर्क साधला जात आहे. शेतकऱ्यांना काय मदत पाहिजेत याचा आढावा घेतला जात आहे, असं अजित पवार म्हणाले.
जयंत पाटील, शंकरराव गडाख, राजेश टोपे, अमित देशमुख, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे आणि वर्षा गायकवाड हे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. आम्ही गेल्यावर प्रोटोकॉल प्रमाणे सर्व शासकिय यंत्रणा आमच्या मागे येते. त्यांचं अख्या दिवसाचं काम बुडते. त्यामुळे गैरसमज पसरवू नका, जेथे पाहणी केली पाहिजे तिथे केली पाहणी जात आहे, असं पवार म्हणाले.