हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडली आहे. औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्यास शिवसेने कडून हालचाली सुरू असतानाच काँग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नामकरणास विरोध करत शिवसेनेला ठणकावले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा सावध प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की नामांतराचा मुद्दा हा महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल. याव्यतिरिक्त राज्यात अनेक प्रश्न आहेत. लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. नामांतराचा मुद्दा तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून सोडवतील, असं म्हणत नामांतरावर त्यांनी शिष्टाईची भूमिका दाखवली.
मेहबुब शेख यांच्यावरील आरोपात तथ्य नाही
राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावरती होत असलेल्या आरोपाचं अजित पवारांनी खंडन केलंय. मेहबूबवर झालेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही. पोलीस तपासात योग्य माहिती समोर येईल. आम्ही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाहीत. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’