हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आपल्या बेधडक कामामुळे आणि निर्णयक्षमते मुळे प्रसिद्ध आहेत. अजितदादा नेहमीच भल्या पहाटे लवकर उठून पाहणी दौरा, बैठका आणि इतर राजकीय कार्यक्रम घेत असतात. आज त्यांनी यामागचं कारण सांगत हे गुण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून घेतले असल्याचं सांगितलं आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय आमच्या चुलत्यांची (शरद पवार) यांची. ते 27 वर्षाचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. आज त्यांचं वय 80 वर्ष पूर्ण असून सकाळ पासून काम करत असतात अस अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार पुढे म्हणाले की, सकाळी लवकर उठण्याची सवय चुलत्याची लागली आहे. आम्ही जस बघतोय तस चुलते 27 वर्षाचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. रात्री दोनला आले तरी सकाळी सात ला काम सुरूच. आता वय वर्ष 80 पूर्ण झालं. तरी देखील आजही सकाळ पासून कस साहेब काम करत असतात, हे आपण पाहतो. शेवटी तुमच्यावर कसे संस्कार होतात त्यावर अवलंबून असतं. सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण देखील स्वछ असतं. एक, उत्साह असतो अस अजित पवार म्हणाले.
दरम्यान, धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर काम केलय. नंतर, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. आपल्याला सर्वात श्रीमंत नाही व्हायचं. पण, पुढं आपलं बर होईल अशा शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून अस म्हणत चांगलं काम करा असा सल्ला त्यांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’