आप्पा तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देतात ; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत धनंजय मुंडे भावुक

0
112
dhananjay and gopinath munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा देत खास ट्विट करत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली. आप्पा तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देतात असे धनंजय मुंडे यांनी म्हंटल.

‘अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. मजूर बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन. हा शब्द देतो’ अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली. आज तुम्ही नाहीत परंतु तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत. अप्पा, तुम्हाला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन. अस ट्विट धनंजय मुंडे यांनी केले.

लोकनेते गोपीनाथ  मुंडे साहेब यांनी समाजातील वंचित, पीडित व उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला म्हणून 3 जून हा त्यांचा पुण्यस्मरण दीन दरवर्षी ‘सामाजिक उत्थान’ दिवस म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जातो, यानिमित्त विविध सामाजिक सेवा उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत असते. यंदा मात्र कोविड महामारीची गंभीर परिस्थिती व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन गोपीनाथ गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम न करण्याचे प्रतिष्ठानने ठरवले आहे, असं  पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here