मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. ते राष्ट्रवादीच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २० वा वर्धापन दिन आहे. त्यानानिमित मुंबई येथे पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडत आहे.
राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार – शरद पवार
महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहे. मात्र सरकार दुष्काळावर मात करण्यासाठी काहीच करत नाही. परदेश दौरे पूर्ण झाल्या नंतरआता नेत्यांना दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्याचीआठवण होऊ लागली आहे असे म्हणत अजित पवार यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमोल कोल्हेंनी केली राज्य सरकारवर सडकून टीका
दरम्यान रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक Live च्या माध्यमातून सामान्य नागरिकाशी संवाद साधण्याच प्रयत्न केला. भाजपने सोशल मीडियातून कमावलेला जनाधार पाहून शरद पवार यांना देखील सोशल मीडियाकडे आकर्षित केले आहे.