हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाविकास आघाडी सरकावर मधील नेत्यांवर ईडी, आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे असलेलं संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. यावरून भाजपकडून केल्या जात असलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. आजचा दिवस हा चांगला आहे. धनत्रयोदशीच्या सणादिवशीच मला ऐकावे एक चिमटेच चिमटे बसत आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले.
आज बारामतीत अटल इनक्युबेशन सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रश्मी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी उपस्थिती लावली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसरी भेट दिली आहे. त्यांना बारामती कशा पद्धतीने बदलले याबाबत माहिती दिली आहे. आजचा दिवस हा धनत्रयोदशीचा, दिवाळी सणाचा आहे. मात्र, मला आजच्या दिवशी एकावर एक असे चिमटेच चिमटे बसत आहेत.
Inauguration of Incubation & Innovation Center | Baramati – LIVE https://t.co/tsUYHeGdW7
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 2, 2021
अजित पवार म्हणाले की, राज्यावर अनेक संकटे आली. मात्र, अशा शकतात राज्य सरकार, महाविकास आघाडीचे सरकार व त्याची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी डगमधले नाहीत. त्यांनी सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने सांभाळलेल्या आहेत. एक मोठा भाऊ या नात्याने त्यांनी आम्हाला प्रेम दिले आहे. आम्ही ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या त्यांनी दिल्या असल्याचे अजित पवार यांनी म्हंटले.