हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी संरक्षणासाठी महत्वाचा असलेल्या इम्पेरिकेल डाटा गोळा करण्याबाबत राज्य सरकारकडून पाऊले उचलली गेली आहेत. त्यानंतर जळगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला. “मी शब्दाचा पक्का आहे. मी जे बोलतो ते करतो. ज्यावेळी महाराष्ट्राचा मंगलकलश दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी आणला. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार रुजवण्याचे काम केले. मात्र, आजचा काळ बघितला तर, विरोधकांना त्रास देण्याचे काम याआधी झाले नव्हते. या जगात कुणी ताम्रपट जन्माला घेऊन आलेला नाही. चार दिवस सासूचे असतात तसे चार दिवस सूनेचेही असतात, असे म्हणत पवारांनी भाजपवर टीका केली.
जळगाव येथील भुसावळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपमधील 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ते म्हणाले की, आजपर्यंत महाराष्ट्रात विरोधकांना व काही ठराविक लोकांना त्रास देण्याचे काम महाराष्ट्रात कधी घडले न्हवते. दुर्दैवाने ते घडत आहे. यावरून एकच म्हणावे लागेल की, चार दिवस सोसायचे असतात त्याप्रमाणे कधीना कधी तर चार दिवस सूनेचेपण येत असतात. कुणीही या जगात ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. यामध्ये शेवटी जनताच सर्वस्व आहे, जनतेच्या डोक्यात आले तर मी मी म्हणणाऱ्यांना डोक्यावर घेते त्याप्रमाणे त्याला खालीही पाडते, असा अप्रत्यक्ष टोला पवार यांनी भाजपला लगावला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तयार केलेली घटना, कायदा एकसंघ राहिला आहे. त्यांनी मतदार राजाला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. तो आता ठरवेल कि कोणाला निवडणून द्यायचे, असे अजित पीआर यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे. निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे आणि प्रवेश केला असता तर बर झाल असतं. जळगाव जिल्ह्यात आज परिस्थिती वेगळी असते. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपात असताना खोटेनाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र. आमचा पक्ष तसा नाही. राष्ट्रवादी पक्ष हा सर्व समाजाला न्याय देणारा पक्ष आहे. सर्व घटकांना घेऊन चालणारा पक्ष असल्याचे पवारांनी सांगितले.