हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यातील नेत्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कोल्हापुरात तक्रार दाखल केली आहे. तर भाजपनेत्यांकडून वारंवार टीका होत असल्याने यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी भाजप विरोधक सातत्याने बोल्ट असल्याने मला भाजपकडून टार्गेट केले जात असल्याचे प्रत्युत्तर मुश्रीफ यांनी दिले आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपकडून दिल्या जात असलेल्या त्रासाबाबत माहिती दिली. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, मी गेल्या अनेक दिवसांपासून तसेच सतत भाजप विरोधात बोलत आहे. त्यामुळे भाजप व त्या पक्षातील नेत्यांकडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. तसेच मला त्रास दिला जात आहे. माझ्या विरोधात सोमय्यांनी जे आरोप केले आहेत त्यामध्ये तथ्य नाही.
भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूर येथे जाऊन कोल्हापूरच्या मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांनी तिसरा १५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. मात्र, सोमय्यांचे आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळले आहेत.