हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकून आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर काल आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला. तर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची चौकशी केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी पक्षाचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. समीर वानखेडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. भाजपची काही लोक वानखेडेंची भेटही घेत असल्याचे मलिक यांनी सांगितले.
नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जो व्यक्ती आर्यनला तुरुंगात घेऊन जात होता. तो तुरुंगात आहे. २ तारखेनंतर परिस्थिती बदलली. जो व्यक्ती आर्यनला जामीन मिळू नये म्हणून शक्तीपणाला लावत होता. तो काल कोर्टात दाद मागत होता. पोलिसांनी जी चौकशी सुरू केली आहे, ती सीबीआय किंवा एनसीबीकडे द्या म्हणत होता. मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा ट्विटरवर फोटो टाकला, पण त्यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल एका शब्दानेही बोललो नाही. माझी लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही, लढाई ही अन्यायाविरोधात आहे. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. पिक्चर अभी बाकी है, संपूर्ण सिक्वेन्स बदलला आहे. धरपकड करणारे आता बचावाचा मार्ग शोधत आहे. म्हणून मी काल म्हटलं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
अजूनही समीर वानखेडे यांची काही भाजप नेत्यांकडून भेट घेतली जात आहे. आर्यन खान व कोर्डेलिया क्रुझवरच्या छाप्याप्रकरणात अजून अनेक गोष्टी समोर येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात सर्वाना समजेल कि या प्रकरणात कोण कोण सहभागी झाले आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत निरापराध व्यक्तीला तुरुंगात डांबणं चुकीचे आहे. वानखेडेंनी सर्व हातखंडे वापरले, आधी म्हणाले की माझ्या कुटुंबला या प्रकरणात घुसडण्यात येत आहे.