केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या ओबीसींचे मोठे नुकसान ; जयंत पाटील यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर ओबीसी आरक्षण मुद्यांवरून सध्या भाजप कडून निशाणा साधला जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून आघाडी सरकारमधील नेत्यांवर अनेक आरोपही केले जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. उद्या कर्नाटक आणि यूपीमध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद सद्भाहला. यावेळी त्यांनी भाजपवर पलटवार केला. ते म्हणाले की, ओबीसींचा पुन्हा सर्व्हे करण्याची वेळ आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आली आहे. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार कुठे कमी पडणार नाही मात्र मुद्दामून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका घेतली आहे.

फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. उद्या कर्नाटक आणि यूपीमध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय आहे. ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्पॅरिकल डेटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात देणे अपेक्षित होतं. दुर्दैवाने लोकसभेमध्ये जे उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. त्यात इमपरिकल डेटा जवळपास 98 टक्के बरोबर असल्याचं विधान केले होतं आणि त्यानंतर केंद्र सरकारने हा डेटा कोर्टात देताना त्यात बऱ्याच त्रुटी आहेत असं विरोधी विधान केलं.

Leave a Comment