हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे.”एनसीबीचे विभागीय अधिकारी सचिन वानखेडे आणि भाजपचा कार्यकर्ता मेहुणा मोहित कांबोज यांची भेट झाली होती. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ आणि एक मोठा खुलासाआपण लवकरच समोर आणणार असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.
‘क्रूझवरील कारवाईत एनसीबीने 11 जणांना ताब्यात घेऊन त्यातील तीन जणांना नंतर सोडून देण्यात आले होते. त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक होते, असा आरोप मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान आज मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, यावर कंबोज यांनी मलिक यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. असे असताना मलिक यांनी पुन्हा नवा आरोप केला आहे.
मलिक म्हणाले, ‘क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोहित कांबोज यांनी नेमके काय काय केले ते मी समोर आणणार आहे. कांबोज आणि समीर वानखेडे यांची 7 ऑक्टोबर रोजी एके ठिकाणी भेट झाली, त्याची मला माहिती आहे. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे असून मी एक-दोन दिवसांत तो सर्वांसमोर सादर करणार आहे. या प्रकरणात कंबोज यांनी काय केले ते मी समोर आणणार आहे. कंबोज आणि वानखेडे यांची ७ ऑक्टोबरला भेट कुठे झाली मला माहीत आहे. येत्या काही दिवसांत त्याचा व्हिडीओ मी लवकरच रीलीज करणार आहे. केवळ हेच नाही तर रिया चक्रवर्तीसह अनेक बॉलिवूड कलाकारांना ड्रग्जप्रकरणात अडकवण्यात आले त्याचाही पर्दाफाश करणार आहे. बॉलिवूड आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र चालू असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला.