राज्यात सध्‍या नेतेमंडळी चोरणारी टोळी फिरतेय; सारंग पाटलांचा हल्लाबोल

0
28
_ Sarang Patil Kapil in Karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या एक टोळी कार्यरत आहे. या टोळीकडून नेतेमंडळांची चोरी केली जात आहे. या चोरणाऱ्या टोळीकडून घरे फोडण्याचे काम केले जातेय, त्यांना येत्या निवडणुकांमध्ये दाखवून द्या व त्यांचा वचपा काढा, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केला.

कराड तालुक्यातील कापील येथे खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी सारंग पाटील म्हणाले की, केंद्रापासून खालीपर्यंत फार वेगळी परिस्थिती आहे. नवनीत राणा आणि सोलापूरच्या खासदारांना आपले पद टिकविण्यास मुदत मिळते; पण राहुल गांधींची खासदारकी जाते, याला काय म्हणायचे, असे पाटील यांनी यावेळी म्हंटले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, जयेश मोहिते, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रा. धनाजी काटकर, कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ मोरे, गोळेश्‍वर विकास सेवा सोसायटीचे संचालक संतोष जाधव, नानासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.