संकटाच्या काळात राजकारण नका करू – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशावर करोनाचं संकट आलं आहे. करोनाशी लढताना कोणीही राजकारण करू नये. करोनाचा पराभव हाच आपला एककलमी कार्यक्रम असायला हवा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तसेच करोनाचा परिणाम सुमारे दोन वर्ष सोसावा लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. वांद्रे स्थानकावरील कामगारांची घरी जाण्यासाठी गर्दी झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय पक्षांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

देशावर करोनाचं संकट आलं आहे. करोनाशी लढताना कोणीही राजकारण करू नये. करोनाचा पराभव हाच आपला एककलमी कार्यक्रम असायला हवा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तसेच करोनाचा परिणाम सुमारे दोन वर्ष सोसावा लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. करोनाशी धीराने सामना केला पाहिजे. भारत सरकार, राज्य सरकारच्या यंत्रणा लढा देत आहेत, योग्य नियोजन करुन सामना करण्याची गरज आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.

फेसबुक लाईव्हवरून संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ”वांद्रे येथील प्रसंग दुर्देवी होता. कुणीतरी आवई उठवल्याने लोक वांद्रे स्टेशन जवळ मोठ्या प्रमाणावर जमले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा सूचना देऊ नका. अफवा पसरवू नका आणि वांद्र्यात जे घडलं त्याची राज्यात कुठेही पुनरावृत्ती घडता कामा नये, असं सांगतानाच राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो. त्यात काही चुकीचं नाही. लोकशाहीत असा संघर्ष होतच असतो. पण सध्या देशात संकट असताना राजकारण करणं योग्य नाही. देशात कुणाचं सरकार आहे आणि राज्यात कुणाचं सरकार आहे, याचा विचारही मनात आणता कामा नये. करोनाचा पराभव हाच आपला एककलमी कार्यक्रम असायला हवा,” असं पवारांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”