Thursday, March 30, 2023

आपण ईडी किंवा आयकर विभागाच्या बापालाही घाबरत नाही; शशिकांत शिंदेंचे थेट आव्हान

- Advertisement -

सातारा । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे थेट ईडीलाच आव्हान दिले आहे. “जरंडेश्वर कारखान्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्याला बाबत अजित पवार साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो नाहीतर किरीट सोमय्याचा तोतडेपणा सर्व बाहेर काढला असता. आपण ईडी किंवा आयकर विभागाच्या बापाला घाबरत नाही,”असे आव्हान शिंदे यांनी दिले आहे.

सातारा येथील एका मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांनी ईडीकडून केल्या जात असलेल्या चौकशीचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. त्यांच्या आरोपानंतर ईडीकडून चौकशी केली जाते. भाजपच्या या असल्या ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जरंडेश्वर कारखान्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्याला बाबत अजित पवार साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो नाहीतर किरीट सोमय्याचा तोतडेपणा सर्व बाहेर काढला असता.

- Advertisement -

आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी धक्कादायक माहितीही दिली. भाजपचे अजूनही माझ्यावर मनापासून प्रेम आहे. मला भाजपने मागील काही काळात 100 कोटींची ऑफर दिली होती. कधी कधी वाटते ते 100 कोटी घ्यायला पाहिजे होते. पण त्यांना कल्पणा आहे की मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.