हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्राच्या किंवा उत्तरप्रदेशमधील मंत्रिमंडळात बदल होवो अथवा ना होवो उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन होणार हे जनतेने मनात पक्के केले आहे’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री मलिक यांनी केले.
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. फेरबदल करायचा की नाही हा अधिकार पंतप्रधानांचा आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळात बदल योगीजी करोत अथवा ना करोत तोही त्यांचा अधिकार आहे. मात्र यावेळी जनतेने बदल करण्याचा विचार पक्का केला आहे’ असे नवाब मलिक यांनी म्हटले.
दरम्यान, प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.