तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील ; राष्ट्रवादीचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना लसीकरण चालू असून कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. विरोधकांकडून या गोष्टीवर आक्षेप नोंदवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला मोदींचा फोटो हटवायला सांगितला. दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावं तिकडे मोदींचे फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं, तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील,” अशा शब्दात नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडियमच नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम अस दिल होत त्यावरून देखील विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment