हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात भाजपची एकहाती सत्ता असून नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा नेता अद्याप विरोधी पक्षांना मिळाला नसल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असताना त्यांनी आपलं मत व्यक्त केले. देशातील विरोधी पक्षाकडे मोदींविरोधात चेहरा नाही असं म्हणता येणार नाही, असं शरद पवार यांनी म्हंटल.
शरद पवार हे आज नाशिक मधील निफाडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्याविरोधातही नेतृत्व नव्हतं. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि नेतृत्व उभं राहिलं. त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही, असं पवार म्हणाले.
दरम्यान यावेळी त्यांनी अमरावती हिंसाचारावर देखील भाष्य करत भाजपवर निशाणा साधला. सार्वजनिक शांततेला धक्का बसेल असं काम एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करताय हे दुर्दैव आहे. तीन चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं जात आहे.- याचा फटका सामान्यानांच बसतो, असं ते म्हणाले