ज्यांना आपला गाव सोडून दुसरीकडं जावं लागत त्यांच्या बद्दल मी काय बोलणार? पवारांचा चंद्रकांतदादांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. यावरून आता राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. या प्रकरणात नाव आलेल्या मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे. त्यातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधताना या संपूर्ण प्रकरणाकर पवार गप्प का आहेत असा सवाल केला होता. यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.

पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा पाटलांच्या विधानाचा हवाला देत शरद पवार यांना त्यांची भूमिका विचारण्यात आली. त्यावर शरद पवार म्हणाले,”त्या लोकांबद्दल मी बोलायचं का? ज्यांना आपला गाव सोडून बाहेर दुसरीकडं जावं लागतं… त्यांच्या बद्दल मी काय बोलणार?,” असा खोचक टोला पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या प्रकरणी आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात म्हणजे कोण आयुष्यातून उठलं हे कळेल असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like