मोदींच्या ‘आंदोलनजीवी जमात’ विधानाची राष्ट्रवादीने काढली हवा ; व्हिडिओतून उडवली टर

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना देशभरातील आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी जमात म्हणून त्यांची खिल्ली उडवली. मोदींच्या या विधानावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीनेही एक व्हिडीओ जारी करून मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे.

भाजपने आजवर केलेले आंदोलन आणि भाजप नेत्यांची आंदोलनावरील भूमिका याचा या व्हिडीओत समावेश आहे. या व्हिडिओतून भाजपचा चेहराच दुटप्पी असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीने एक मिनिटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर ‘ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात’ असं कॅप्शन दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like