हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत आले असून त्यांच्याकडून उद्योगपतींच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. या दरम्यान भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर घेऊन जाणार आणि इथे वडापाव खायला घालणार का? असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. “आशिष शेलार तुम्हीही गुजराती शिकून घ्या. नाही तर तुम्हाला कधी गुजरात दाखवतील याचा पत्ताही लागणार नाही,” असा टोला क्रास्टो यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट करीत भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गुजराती भाषेवरून चांगलेच फटकारले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “भाई आशिष शेलार तुम्हाला गुजराती बोलायला आवडत आहे. आवडत असेल तर तुम्हीही शिकून घ्या. कारण तुमच्या पक्षाचा काही भरोसा वाटत नाही. गुजराती तुम्हाला कधी गुजरात दाखवतील पत्ता लागणार नाही.”
ભાઈ આશિષ શેલાર, તમને ગુજરાતી બોલતા આવડે છે ? નહીં આવડતું હોય ને, તો સીખી લો, તમારી પાર્ટી નોં કોઈ ભોરોસો નહીં, એક દિવસ તમને પણ ગુજરાત લઈ જશે એલોકો @ShelarAshish pic.twitter.com/xhkB6sY5SQ
— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) December 2, 2021
दरम्यान, काल भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्ट्रातील तरुणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?, असा संतप्त सवाल शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या टीकेला क्रास्टो यांनी प्रत्युत्तर दिले आहे.