भाजपला लोकांना मारून राजकारण करायच आहे; नवाब मलिकांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्प संख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सध्याच्या घडीला राजकारणापेक्षा जीव वाचवणे गरजेचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे जीव जात आहेत. आत्महत्या करीत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही भाजपला लोकांना मारून राजकारण करायचे आहे, अशी टीका मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या राजकारणापेक्षा जीव वाचवणं गरजेचं आहे. लोकांचा जीव वाचवणं गरजेचं आहे. मात्र, अशात भाजपकडून राजकारण केले जात आहे. त्यांना लोकांना मारून राजकारण करायचे आहे. भाजप दुखवट्याच्या नावाखाली काही लोक दिशाभूल करून तिथे बसवत आहेत.

सध्या एसटी कामगारांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. एखादा वकिल लोकांची दिशाभूल करत असेल, दिशाभूल करत असेल तर हे चालणार नाही. ते खपवून घेतले जाणार नाही. आणि सर्वात मोठी दिशाभूल हि जी काही होत आहे. ती कर्माचारी नाही तर एका वकिलामुळे दिशाभूल होत आहे, अशा आरोप मलिक यांनी केला आहे.