हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला. या निमिताने राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. “काही लोक प्रश्न विचारत आहेत कि दोन वर्षात काय केले. आम्ही काटकसरीचे धोरण स्वीकारल्यानंतर सरकारने भूमिका घेतल्या नंतर सरकारने ठरवले जास्त गाजावाजा करायचे नाही. उत्तर प्रदेशात काहीही काम झाले तरी मुंबईत त्याची चर्चा होते. मात्र, या सरकारचे धोरणच आहे कि बाते कम आणि काम जादा, असे मलिक यांनी म्हंटले.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. आजच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला. दोन वर्षात सरकारने चांगली कामगिरी केली. अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आल्या, पण महाविकास आघाडीचे सरकार कधी विचलित झाले नाही. यशस्वीरीत्या सर्व परिस्थिती हाताळली. मात्र, काही लोक प्रश्न विचारत आहेत कि दोन वर्षात काय केले. आम्ही काटकसरीचे धोरण स्वीकारल्यानंतर सरकारने भूमिका घेतल्या नंतर सरकारने ठरवले जास्त गाजावाजा करायचे नाही. पाहतोय उत्तर प्रदेशात काहीही काम झाले तरी मुंबईत त्याची चर्चा होते. मात्र, या सरकारचे धोरणच आहे कि बाते कम आणि काम जादा. इतरांचे धोरण हे कामे कमी आणि बोलायचे जास्त.
मागील वर्षीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली पण तीन वर्षात त्यांनी कर्जमाफी केली नाही तीन वर्षात नुसता घोळच केला. त्यामुळे शेतकरी आंदोलन करीत राहिले. आणि या शेतकऱ्यांना त्यांना काहीही न्याय देता आला नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली. जवळपास वीस हजार कोटींची कर्जमाफी आमच्या सरकारने केली आहे.
राज्यात सरकारला तीन महिने पूर्ण झाले नाहीत तोवर कोरोनाचे संकट आले. आणि त्या नागरिकांचे औषध उपचार करण्याची जबाबदारी सरकारने घेतली. एकाही रुग्णाने तकार केलेली नाही. राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा, तालुक्यात कोविड सेंटरची उभारणी केली. भाजपशासित राज्यांमध्ये आणि दिल्लीसारख्या राज्यात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांचे कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं अंतिम संस्काराचा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाला नाही. उत्तर प्रदेशात गंगेच्या किनारी प्रेत दफन करावी लागली, असं नवाब मलिक म्हणाले.