महाविकास आघाडी सरकारला उखडून टाकण्याची भाषा करू नका, खपवून घेणार नाही; नवाब मालिकांचा भाजपला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी दंगली घडल्या त्यामागे भाजपचाच हात आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यासह सर्व नेत्यांनी २ रोजी दंगा घडवण्याचे षडयंत्र रचले. त्यांच्यावर आज कारवाई होत आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते सांगतात महाराष्ट्रातून आघाडी सरकार उखडून टाकू. सरकार उखडून टाकायचे भाषा त्यांनी करू नये, महाराष्ट्रातील जमिनीवर ते खपवून घेणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपचे सर्व शस्त्र जेव्हा संपतात तेव्हा भाजप दंगली घडवण्याचे शस्त्र बाहेर काढते. अमरावती येथे अशाच प्रयत्न केला गेला. भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्यासह सर्व नेत्यांनी २ रोजी दंगा घडवण्याचे षडयंत्र रचले. यासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात पैसे गेले. आज त्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता अशा प्रकारचे हीं स्वरूपाचे राजकारण भाजपकडून केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असे मलिक यांनी सांगितले.

https://www.facebook.com/NawabMalikOfficial/videos/281109393948795

नांदेड, अमरावती आणि मालेगावातही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला गेला. यामागे नक्कीच भाजपचा हात आहे. ज्यावेळी कोणतेच शस्त्र भाजपकडे नसेल त्यावेळी ते अशा प्रकारचे दंगलीचे राजकारण करते. त्यानंतर दुसरे शस्त्र काढले जाते तपास यंत्रणांच्या माध्यमातून लोकांना भीती दाखवायची. त्याच्या माध्यमातून दबाव टाकायचे. भाजपला आम्ही एकच सांगतो कि अशा प्रकारचे हीन राजकारण करू नये. महाराष्ट्रातील जनतेला आता चांगले कळू लागले आहे, असे मलिक यांनी सांगितले.

Leave a Comment