औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध, राष्ट्रवादीची भूमिका काय? नवाब मलिक म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी शिवसेनेकडून पावलं उचलली जात आहेत. अशावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं मात्र नामांतरासाठी ठाम विरोध दर्शविला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘शहरांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. हा प्रस्ताव २० वर्षांपूर्वीच आम्ही अमान्य केला होता. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु असल्याच्या वृत्ताचंही नवाब मलिक यांनी खंडन केलं आहे. ”अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीतील अजेंडावरील नाहीये. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरीही सरकारला कोणताही धोका नाही,’ असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या मुद्द्यांवर एकत्रित बसून तोडगा काढतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यांच्या नामांतराचा मुद्दा काही घटकांकडून पुढे केला जातो आहे, अशी टीकाही केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment