फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीचा समीर वानखेडेंशी संबंध; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. दरम्यान त्यांनी भाजप मधील नेत्याचा हिवाळी अधिवेशनात पोलखोल करणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर मलिक यांनी भाजप नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित व्यक्ती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटत असून त्याचे नाव निरज गुंडे आहे. हा फडणवीस सरकारचा दलाल असल्याचा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्यावेळी मागील काळात फडणवीस सरकार होते. त्यावेळी निरज गुंडे या नावाचा व्यक्ती या सरकारचा दलाल होता तसेच अजूनही आहे. हा दलाल माझ्यावर आरोप करत आहे. ज्याच्या घरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन बसत होते. त्या दलालाला मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश होता. तो दलाल वर्षावर कायम फिरत असायचा, सगळ्या विभागाच्या सचिवांच्या कार्यालयात जायचा. महापालिकेत वारंवार जात होता. याच दलालांकडून मध्यंतरी काळात रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

यानंतर आता हा दलाल एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत होता. अशी कोणती भीती या नेत्यांना वाटत आहे. त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही सर्व प्रकरने विधानसभेच्या पटलावर आपण आणणार आहोत. समीर वानखेडेचे कुटुंब आठवले आणि सोमय्या यांना भेटत आहेत. त्या अगोदर समीर वानखेडेने आठवले यांची भेट घेतली आहे. तर काही मागासवर्गीय नेत्यांचीही भेट घेतली आहे, असे मलिक यावेळी म्हणाले.

You might also like