हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल आयकर विभागाच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाच्या छाप्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “विरोधकांनी लक्षात ठेवावे ते अजितदादा आहेत…”असे चाकणकर यांनी म्हंटले आहे.
आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयावर 7 ऑक्टोबरला धाडी टाकल्या. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही आयकरने छापेमारी केली. यावरून चाकणकर यांनी भाजपवर ट्विट करून निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, विरोधकांनी लक्षात ठेवावे ते अजितदादा आहेत…माणूस स्वतःवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करेल परंतु यामध्ये विनाकारण घरातील महिलेला मध्ये ओढून यातून राजकारण करत असेल तर तो व्याजासकट याचा हिशोब चुकता करत असतो.
विरोधकांनी लक्षात ठेवावे ते अजितदादा आहेत..
माणूस स्वतःवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करेल परंतु यामध्ये विनाकारण घरातील महिलेला मध्ये ओढून यातून राजकारण करत असेल तर तो व्याजासकट याचा हिशोब चुकता करत असतो.१/२@AjitPawarSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra pic.twitter.com/TBjF476Zq8— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 8, 2021
रुपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर एनसीबीने केलेल्या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. तसेच भाजपवरही निशाणा साधला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्या नातेवाईकांवर केलेल्या कार्रवाईवरून एनसीबी व भाजपवर टीकास्त्र डागले आहे.