मुंबई प्रतिनिधी | शिवसेना आणि भाजपने सत्ता कायम राखण्याच्या उद्देशाने राज्यभर वेगवेगळ्या यानंतरचे आयोजन केले आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीने देखील शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. येत्या ६ ऑगस्ट पासून राज्याच्या कानाकोपऱ्यात हि यात्रा जाणार असून खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडे या यात्रेचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर या यात्रेचे स्टार प्रचारक खासदार उदयनराजे भोसले हे असणार आहेत.
राष्ट्रवादी फोडून फोडून खिळखिळी केल्याने राष्ट्रवादीला नवं संजवनी देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत डॉ. अमोल कोल्हे स्टार प्रचारक असल्याने सभांना गर्दी उसळेल असे राष्ट्रवादीचे मत आहे. त्यांच्या गुडइमेजचा राष्ट्रवादी चांगलाच उपयोग करून घेणार आहे असे चित्र सध्या बघायला मिळते आहे. तसेच त्यांची स्वच्छ प्रतिमा हि राष्ट्रवादीच्या फायद्याची असणार आहे. त्यामुळे हि यात्रा राष्ट्रवादीची थोडीफार स्थिती सुधरवण्यास मदत करेल अशी अशा राष्ट्रवादीच्या लोकांना आहे.
मागील काही दिवसापासून अजित पवार हे पक्ष अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकणार आहे असे म्हणत होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाने हि जबाबदारी सोपवली आहे. अमोल कोल्हे सत्ताधारी भाजप समोर आव्हान उभा करू शकणार का हे देखील आगामी काळात पाहण्यासारखे राहणार आहे.