मुंबई प्रतिनिधी | लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे. या कामाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घ्यावी असे शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या विधाना नंतर पक्षातील प्रस्तापित नेत्यांच्या अंगावर अक्षरशः शाहारा उभा राहिला आहे.
शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक
राष्ट्रवादीचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार शरद पवारांनी केल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्या नंतरच शरद पवार यांनी पक्षात मोठे बदल घडवण्याचे संकेत देले होते. तर आज वर्धापन दिनी केलेल्या भाषणात तर त्यांनी तरुणांना संधी देण्याचा पक्का निर्धारच स्पष्ट केला आहे. गोर गरीब कष्टकरी समाजाच्या मुलांना संधी देण्याचा मानस शरद पवारांनी आज बोलून दाखवल्याने नेमकी कोणाची खुर्ची धोक्यात येणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.
अमोल कोल्हेंनी केली राज्य सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान गुहेत जावून बसतात त्यांच्या या कृतीतून तरून पिढीने नेमका कोणता संदेश घ्यावा हा संभ्रमच तयार होतो आहे. आपला पक्ष ग्रामीण भागात विस्तारित झाला आहे. मात्र शहरी भागात पक्षाची वाढ म्हणावी तशी झाली नाही. त्यामुळे येत्या काळात पक्षाला शहरी भावात वाढवले पाहिजे असे शरद पवार म्हणाले आहेत.