Wednesday, February 1, 2023

मनसेच्या हनुमान चालीसेला राष्ट्रवादीचे ‘उत्तर’; हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून एकमेकांवर टीका टिपण्णी केली आहे. त्यामुळे सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज संध्याकाळी इफ्तारचे आयोजन करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानंतर उद्या पुण्यात पुण्यात मनसेकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सामूहिक हनुमान चालीसा पठण केले जाणार आहे. मनसेच्या या मोहिमेला आता राष्ट्रवादी काँग्रेसने अनोख्या पद्धतीने उत्तर दिले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसने हनुमान जयंतीचा प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज संध्याकाळी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले आहे.