हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल मुंबईत अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडीओ क्लिप सभागृहात सादर करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी मोठे साहेब असा ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख केल्याचेही म्हणत हे मोठे साहेब कोण? असा सवालही उपस्थित केला. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “पवार साहेबांनी वर्शोंवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय. पवार साहेबचं पाकिस्तानचे एजंट तर नाही ना असा संशय यायला लागला आहे, असे राजे यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी आज ट्विट करीत थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, “पवार साहेब नावाने मोठे झाले असले तरी मनानी मोठे नाही. त्यांनी वर्शोंवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय, त्यांनी पोसलेले कीडे आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत. पवार साहेबचं पाकिस्तानचे एजंट तर नाही ना असा संशय यायला लागला आहे,” असे राणे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान भाजप नेत्यांकडून करण्यात आलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावले आहेत. आज पत्रकार परिषद घेत पवार यांनी त्याच्यावर केलेल्या आरोपांविषयी भूमिका मंडळी. यावेळी ते म्हणाले की, सर्व आरोपांची सरकारनं चौकशी करावी.
पवार साहेब नावाने मोठे झाले असले तरी मनानी मोठे नाही. त्यांनी वर्शोंवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय, त्यांनी पोसलेले कीडे आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत. पवार साहेबचं पाकिस्तानचे एजंट तर नाही ना असा संशय यायला लागला आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 9, 2022
ज्या काही गोष्टी फडणवीसांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मी कौतुक वाटलं एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत १२५ तासांची रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे. १२५ तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे.