हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डी गॅंग संबंधित व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा मलिक यांचा दावा चुकीचा असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यांनतर भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता काय स्वत: दाऊदने फोन करून सांगावं राष्ट्रवादीवाल्यांना की त्यांचा राजीनामा घ्या?” असा सवाल करत निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे
मुंबई हायकोर्टाने नवाब मलिकचा बेल अर्ज फेटाळला, आता काय स्वतः दाऊदने फोन करून सांगावं राष्ट्रवादी वाल्यांना की याचा राजीनामा घ्या???
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 15, 2022
दरम्यान, इडीकडून आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचा दावा करत नवाब मलिक आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र मलिक यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा आहे असे म्हणत कोर्टाने मालिकांची याचिका फेटाळली आहे. कोर्टाच्या या निर्णयाने नवाब मलिक यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मलिक आता कोणत्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.