हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी पत्रकार घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 48 तासाचा अल्टिमेटम दिला होता. पवारांच्या अल्टिमेटमला 48 तास झाले असल्याने ते अद्याप बेळगावला गेले नाही. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता, त्याचं काय झालं??, असा सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी केला.
निलेश राणे यांनी आज एक ट्विट केले असून त्यांनी खासदार शरद पवार यांना डिवचले आहे. “ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं??” असा सवाल राणेंनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.
ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 9, 2022
शरद पवार काय म्हणाले?
कर्नाटकमधील बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अल्टिमेटम दिला होता. “मुख्यमंत्री बोम्मईकडून चिथावणीखोर वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. 48 तासात महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. तर मलाही कर्नाटकमध्ये जावं लागले, असे पवार यांनी म्हंटले होते.
कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतळ्याचं दहन
महाराष्ट्रातील १० वाहनाच्या तोडफोडीनंतर कर्नाटक येथील कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अजूनही आक्रमक पावित्रा घेतला जात आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाही दिल्या.