हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील भाजपच्या बूस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीसांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी बाबरी मशिदी संदर्भात आज पुरावेच सादर केले. त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. राऊतांनी बाबरी मशिदीबाबत बोलणे म्हणजे हलकटपणाचे कळस आहे. जेव्हा मशीद पाडली तेव्हा तुम्ही सामनाचा पगार तरी घेत होता का? असा सवाल राणे यांनी करीत राऊतांना टोला लगावला आहे.
नितेश राणे यांनी आज त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्विट केला असून त्यांनी त्यामध्ये म्हंटले आहे की, संजय राऊत यांनी माझ्या काही प्रश्नाची उत्तरे द्यावीत कि बाबरी मशीद पाडली तेव्हा तुम्ही कोठे होता. लोकप्रभाच्या माध्यमातून तुम्ही काम करत होता.
तुम्ही कुठे होता..@rautsanjay61 pic.twitter.com/V6R8hd99xV
— nitesh rane (@NiteshNRane) May 2, 2022
दि. 26 एप्रिल 1992 चे एक आर्टिकल दाखवत नितेश राणे यांनी संजय राऊत यांची त्यावेळची राम मंदिराबाबत असणारी भूमिका सांगितली. यावेळी राणे म्हणाले, राऊतांनी रामाची राजकीय फरफट या नावाचे आर्टिकल लिहले असून त्यात राम मंदिराच्या विरोधात म्हंटले आहे. आता तोच संजय राऊत तोंड उघडून बोलत असेल तर खरच हलकट पणाचा कळस म्हणावा लागेल, असे म्हणत राणे यांनी राऊतांवर टीका केली.
संजय राऊत काय म्हणाले?
आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत देवेंद्र फडणवीसांनी काल केलेल्या टीकेला उत्तर दिले होते. बाबरीच्यावेळी शिवसेना कुठे होती हे तुमच्या नेत्यांना विचारा? असे संजय राऊत म्हणाले होते. तसेच त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करीत सामनाचे कात्रणही सादर केले आहेत.