राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे एका स्टेजवर भाषण करायला आले तर “फुल्ल पैसा वसूल हास्य दंगल” ठरेल ; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनात दररोज सर्वपक्षीय नेते मंडळी आपल्या दमदार आणि अभ्यासपूर्ण भाषणाने साऱ्या सभागृहाचं आणि राज्याचं लक्ष वेधून घेत आहेत.सभागृहात कुठं एखादा शब्द वापरून कुणाचीतरी विकेट घेतली जातेय तर काहीतरी आठवण सांगून हास्याचे फवारे फुलवले जातं आहेत.

अधिवेशनाचा कालचा दिवस पाहिला तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग करत सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते.तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास आपल्या ठाकरी शैलीत जोरदार भाषण केले.एका जेष्ठ पत्रकाराच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरेंची परंपरा आता खऱ्या अर्थाने जपली आहे. असं म्हणावं लागेल.एवढं त्यांचं आजचं भाषण दमदार होतं.आता या सगळ्यावर चर्चा रंगताना दिसतं आहेत.

नुकतंच भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलंय.त्यात ते असं म्हणतात की ” मला सांगावं वाटतं की राहुल गांधीना उद्धव ठाकरे हे कॉम्पेटेटर म्हणून आले आहेत.एखाद्या दिवशी राहूल गांधी आणि उद्धव ठाकरे एकच व्यासपीठावर आले.तर ती फुल्ल पैसा वसूल हास्य दंगल असेल.

दरम्यान, नुकतंच नितेश राणे यांचे जेष्ठ बंधू माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जात टीका केली होती.एकेरी संबोधन वापरत.राज्याच्या मुख्यमंत्री असणाऱ्या नेत्यावर टीका केली होती.तीच परंपरा धाकटे नितेश राणे देखील पुढे चालवत आहेत असं दिसतंय.

You might also like