कॅमेऱ्यापलीकडे कधीही बघत नव्हते मग सेनेशी संबंध कसा? राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा वेस्टिन हाँटेलच्या सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित आज 56 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या नंतर आता भाजप नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी “बाळासाहेब हे हिदुत्वाचे बाप आहेत हे आम्हाला माहिती आहे, मात्र तुम्ही सेक्युलरांचे जे बाप आहेत त्यांच्या कुशीत जाऊन सत्तेसाठी धोका दिला. तुम्हाला आतापर्यंत कॅमेऱ्यापलीकडे काहीही दिसत न्हवते मग तुमचा सेनेशी संबंध कसा? असेल सवाल विचारला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला पलटवार केला. “शिवसेने सत्तेसाठी हिंदूत्व सोडल्याची टीका ही वारंवार भाजपकडून होत आहे, मात्र, मी त्यांना विचारतो कि, आजची शिवसेना शिवसैनिकांची राहिली आहे का? बाळासाहेबांची किंवा आनंद दिघे साहेबांची राहिली आहे का? तसेच ही जर बाळासाहेबांची असती तर आजच्या कार्यक्रमाची सुरूवात ही अनिल देसाई नाही तर एकनाथ शिंदे यांनी केली असती. मुख्यमंत्र्यांना आजपर्यंत कॅमेऱ्या पलीकडचे काहीही दिसत नव्हते. मग आता कसे दिसायला लागले.

खरं तर शिवसेनेचे खासदार हे मोदीसाहेबांचा फोटो लावून निवडून आले आहेत. तुमच्या वैयक्तिक कामासाठी आणि मेव्हण्याला वाचवायला मोदी सरकार लागतं, तर अडीच वर्षात तुम्ही शिवसैनिकांसाठी काय केल? असा सवालही राणे यांनी केला आहे. आज तुम्हाला आईच्या दुधाची भाषा करावी लागतेय कारण आज शिवसैनिक काय खात आहे, काय करत आहेत, हे कधी पाहिलचं नाही. त्यामुळे आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक याला उद्याच्या निवडणूकीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Leave a Comment