नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणाले-“खासगी ट्रेन चालवल्यास रेल्वे थांबणार नाही, याचा सर्वांनाच फायदा होईल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी रेल्वे मंत्रालयाने गाड्यांच्या खासगीकरणाबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. गुरुवारी पत्रकार परिषदेत कांत म्हणाले की,’रेल्वेच्या या पुढाकाराने आपण देशात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गाड्या चालवू शकू. या पत्रकार परिषदेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही सहभागी होते. खासगी कंपन्या रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करणार असल्याचे कांत यांनी सांगितले. याचा फायदा भारतीय रेल्वे आणि गुंतवणूकदारांनाही होणार आहे.

सर्व 151 गाड्या 2027 पर्यंत सुरू होतील
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, ‘109 ठिकाणाहून सुरू होणाऱ्या गाड्यांचा विचार केला जात आहे. ते 12 क्लस्टर्समध्ये असतील आणि एकूण 151 गाड्या असतील. त्यांना पारदर्शक आणि स्पर्धात्मक बिडिंगद्वारे आणले जाईल. ज्या मार्गांवर प्रवाशांची कमी मागणी असेल तेथे प्रिमियम प्रवासी सेवांची सुविधादेखील पुरविली जाईल. सर्व प्रथम, 2023 मध्ये 12 खासगी गाड्या सुरू केल्या जातील. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षात आणखी 45 गाड्या सुरू केल्या जातील. प्रारंभिक टाइमलाइननुसार 2027 पर्यंत सर्व 151 गाड्या सुरू केल्या जातील.

8 जुलै रोजी, रिक्वेस्ट फॉर क्वॉलिफिकेशन (RFQ) सादर केली गेली. यावर नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय होईल. यानंतर मार्च 2021 मध्ये आर्थिक निविदा उघडण्यात येईल आणि एप्रिल 2021 पर्यंत निविद्यांची निवड केली जाईल. एकूण बोलीच्या जास्तीत जास्त वाटा देणाऱ्या निविदाकारांना या प्रकल्पासाठी निवडले जाईल.

खासगी गाड्यांचे भाडे बाजारपेठेनुसार निश्चित केले जाईल
या खासगी गाड्यांचे भाडे बाजारपेठेनुसार निश्चित केले जाईल, असे कांत म्हणाले. प्रवाशांना व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस देखील देण्यात येईल. खासगीकरणातून रेल्वेमध्ये सुमारे 30 हजार कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.

खासगी ट्रेन आल्यानंतर रेल्वे बंद होणार नाही
या व्यतिरिक्त पुढील वर्षाच्या अखेरीस 50 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे काम करण्यात येईल असे अमिताभ कांत यांनी स्पष्ट केले. आम्ही रेल्वेचे खाजगीकरण करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासगी कंपन्या या रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करतील. ते म्हणाले की,’ एसबीआय खासगी बँकेत आल्यानंतर बंद झाली नाही. इंडिगो, विस्तारा आल्यानंतर एअर इंडियाही थांबलेली नाही. अशा खासगी गाड्यांच्या आगमनानंतर भारतीय रेल्वेही थांबणार नाही, परंतु क्षमता आणि स्पर्धा मात्र आणखी वाढेल.’

यावेळी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले की, ’24 मार्चपर्यंत हाय डेन्सिटी रूट्सवर डबलिंग, ट्रिपलिंग व इलेक्ट्रिफिकेशनचे काम पूर्ण केले जाईल. डिसेंबर 2020 पर्यंत गांधी नगर आणि हबीबगंज स्थानकांचा पुनर्विकास होईल, असे त्यांनी सांगितले.

या स्थानकांवर घेतला जाईल युझर चार्ज
प्रवाशांना ऑन डिमांड तिकिटांचे बुकिंग करण्याची सुविधाही मिळणार आहे. विमानतळाप्रमाणेच रेल्वे स्थानकांवरही आता युझर चार्ज लागणार आहे. ते म्हणाले की ,’जागतिक स्तरावरील सुविधांसाठी युझर चार्ज आवश्यक आहे. येत्या 5 वर्षात जेथे प्रवाश्यांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे, तेथे युझर चार्ज आकारला जाईल. 7 हजार स्थानकांमधील एकूण 10-15% स्थानकांवर युझर चार्ज आकारला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like