कोणी कितीही प्रयत्न केले तरी येणार फक्त नरेंद्र मोदीच : देवेंद्र फडणवीसांची पवारांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील राजकीय रणनितीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. किशोर यांनी आज पुन्हा पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर आले. पवार व किशोर यांच्या भेटीवरून व बैठकीवरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. त्यांनी पवारांवर टीका केले आहे. कपोनि कितीही बैठका घेऊ दे, कितीही प्रयत्न केले तरी येणार तर फक्त नरेंद्र मोदीच आहेत, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमढील नेत्यांकडून स्वबळचवर येणाऱ्या निवडणूका लढविण्याचा निर्धार व्यक्त केला जातं आहे. अशात अचानक दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून बैठका घेतल्या जात आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात विरोधी सर्व पक्षातील नेत्यांशी पवारांनी चर्चा केली आहे. याबाबत महाराष्ट्रातील भाजपमधील नेत्यांकडून टीका, टोलेबाजी केली जात आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांकडून घेतल्या जात असलेल्या बैठकीवरून टीका केली आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणी किती बैठक घेऊ दे, २०१९ मध्येही असाच प्रयत्न केला गेला होता. कोणी कितीही प्रयत्न करू दे, कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, अजूनही देशातील लोकांच्या मनामनामध्ये नरेंद्र मोदीच आहेत. आणि येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोडिव्हीज विजयी होणार आहेत, असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला आहे.