Saturday, March 25, 2023

LPG सिलिंडरवर ‘या’ महिन्यातदेखील नाही मिळणार अनुदानाची रक्कम, सरकार हे पैसे का रोखत आहे ते जाणून घ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरगुती गॅस सबसिडी या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये घरगुती गॅसवर मिळणार नाही. परंतु आपल्या लक्षात हे आले असेलच की, मागील 4 महिन्यांपासून गॅस सबसिडीचे पैसे आपल्या खात्यात जमा होत नाहीयेत. तुम्हाला मेपासून मिळणारी गॅस सबसिडी सरकारने रद्द केली आहे. परंतु हे अनुदान संपविण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यानंतर, घरगुती सिलिंडर्सचा बाजारभाव मेमध्ये 162.50 रुपयांनी घसरून 581.50 रुपये झाला, यामुळे अनुदानित आणि विना अनुदानित सिलिंडरची किंमत एकच झाली. सप्टेंबरमध्ये देशांतर्गत एलपीजीच्या किंमतींमध्येही बदल झालेला नाही.

एलपीजी सिलिंडर अनुदानाची रक्कम खात्यात का येत नाही?
इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या किंमती बदलल्या तेव्हाच गॅसवरील अनुदान संपविण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे मे, जून आणि जुलैमध्ये गॅस घेतल्यानंतरही ग्राहकांकडून शुल्क आकारले गेले तसेच अनुदानाची रक्कमही खात्यात ट्रान्सफर केली गेली नाही.

- Advertisement -

गॅस सिलिंडरचा बाजारभाव किंवा अनुदानाशिवाय सिलिंडर्सची किंमत बरीच खाली आली आहे. दरम्यान, अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. या प्रकरणात, दोन सिलिंडरमधील किंमतीतील फरक जवळजवळ संपला आहे. यामुळेच सरकारने आता घरगुती गॅस सिलिंडरला सबसिडी देणे बंद केले आहे.

अनुदान संपल्यानंतर काय झाले?
गेल्या एक वर्षापासून LPG सिलिंडरवरील अनुदानात सतत कपात केली जात आहे. म्हणूनच अनुदानित सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाले आहे. यासह, त्यावर मिळणारे अनुदान शून्यावर आले आहे. देशाच्या राजधानी दिल्लीत गेल्या वर्षी जुलैमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची बाजारभाव 637 रुपये होती, जी आता खाली आली आहे आणि 594 रुपयांवर आली आहे. जर तुम्हाला यापेक्षा जास्त सिलिंडर हवे असतील तर तुम्हाला बाजारभावाने खरेदी करावे लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.