ट्विटरवर नूडल्सची ‘अशी’ रेसिपी व्हायरल झाली कि लोकं म्हणाले, ‘हा तर अपराध’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही खास रेसिपी बर्‍याचदा सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होतात. सध्याच्या कोरोना लॉकडाउन दरम्यान, लोकांनी डालगोना कॉफी ट्राय करुन पाहिली. या कॉफीनंतर, पॅनकेकसह बर्‍याच रेसिपीज व्हायरल झाल्या, मात्र आजकाल सोशल मिडियावर एक रेसिपी ट्रेंड होते आहे, जिला पाहून प्रत्येकजण अवाक होत आहेत. ही रेसिपी ऐकल्यानंतर, फक्त ewww… हेच तुमच्या तोंडातून बाहेर पडणार आहे. ही एक चॉकलेट मॅगीची रेसिपी आहे.

हो, आपण बरोबरच वाचले आहे चॉकलेट ते ही मॅगी बरोबर. ही रेसिपी बनव्हायचे बाजूला ठेवून लोकांनी यावर विचित्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही चॉकलेट मॅगी पाहून ट्विटर यूजर्स भडकले आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला. असे बरेच युझर्स आहेत ज्यांनी आपला राग व्यक्त करत म्हंटले – कृपया असे करू नका.

 

लोकं हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. आणि कमेंट देताना असे लिहिले आहे की … दोन स्वादिष्ट गोष्टीना एकत्र मिसळण्याची गरज नाहीये. चॉकलेट मॅगी पाहून सोशल मीडिया युझर्सनी कशा प्रतिक्रिया व्यक्त केल्यात ते पाहूयात.

 

श्रीकांत नावाच्या युझरने एक फोटो शेअर करत म्हटले की हा गुन्हा आहे.

 

 

शेल्डन जे म्हणाला कि मी हे काय पाहिल…

 

मुदित जैन म्हणतात की हे पाहिल्यानंतर मनात एक भीती निर्माण झाली आहे.

 

 

ही रेसिपी पाहिल्यानंतर एका युझरने म्हंटले की, “तौबा-तौबा आणि बस तौबा”

या व्यतिरिक्त काही युझर्स अशी रेसिपी करण्याची कोणाची हिंमतच कशी होते हे विचारत आहेत. जाऊ द्यात, लोकांचा आपला आपला मूड आणि टेस्ट असते, ते काहीही ट्रे करु शकतात. तर मग या रेसिपीबद्दल आपण काय विचार केलात ?