अबब! अमेरिकेत कोरोनाचे ७० हजारहून अधिक रुग्ण, १००० जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अमेरिकेत कोरोनाव्हायरसने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या ७० हजारांवर गेली आहे, तर या साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा एक हजारापेक्षा जास्त झाला आहे.

अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजीनियरिंगने (सीएसएसई) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी दुपारी १.४५ पर्यंत कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या आतापर्यंत ७५,२३३ आहे. आतापर्यंत १,०७० मृत्यूची नोंद झाली आहे.

वृत्तसंस्था शिन्हुआने आपल्या अहवालात म्हटले आहे की न्यूयॉर्क देशातील कोविड -१९ साथीचा केंद्रबिंदू बनला आहे. आतापर्यंत संक्रमणाची एकूण ३७,२५८ प्रकरणे नोंदली गेली आहेत.सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनियरिंगच्या माहितीनुसार न्यू जर्सी आणि कॅलिफोर्नियामध्ये अनुक्रमे ४,४०७ आणि ३,२४७ रुग्ण आढळले आहेत.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment