आता गुगलही काढणार स्मार्ट डेबिट कार्ड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल आता फिजीकल कार्डदेखील बाजारात आणणार आहे.गुगल फिजिकल आणि वर्चुअल डेबिट कार्ड्स बनवित असल्याची बातमी समोर आली आहे. एका अहवालानुसार गुगलकडून आलेल्या या डेबिट कार्डची एक इमेज पब्लिश झाली आहे. या अहवालानुसार गूगल कार्ड व त्याच्याशी संबंधित खात्यातून शॉपिंग करता येते.हा मोबाईल फोनवर किंवा ऑनलाइनही वापरला जाऊ शकतो.

सिटी आणि स्टेनफोर्ड फेडरल क्रेडिट युनियनसह या कार्डासाठी गुगलने वेगवेगळ्या बँकांबरोबर भागीदारी केल्याचे सांगण्यात आले आहे. हे गुगल डेबिट कार्ड मॉनिटर केले जाऊ शकते आणि गुगल च्या अ‍ॅपशी कनेक्टही केले जाऊ शकते. येथून ट्रांझॅक्शन हिस्टरीपासून ते बॅलन्स चेक आणि अकाउंट ब्लॉक सारखे व्यवहारही केले जाऊ शकतात.

गुगलचे फिजिकल डेबिट कार्ड केवळ गुगलपे अंतर्गतच कार्य करेल. महत्त्वाचे म्हणजे गुगलने २०१४ मध्ये गुगल वॉलेट लाँच केले होते. त्यानंतरही कंपनीने वॉलेटमधील शिल्लक वापरण्यासाठी डेबिट कार्ड देणे सुरू केले.दोन वर्षांनंतर २०१६ मध्ये गुगलने हे थांबवले होते.नंतर हे अ‍ॅप गूगल वरून गुगल पे मध्ये रूपांतरित झाले.भारताबादल बोलायचे तर गुगलने इथे पहिले TEZ लाँच केल्या ज्याला नंतर गुगल पे मध्ये रूपांतरित करण्यात आले.

महत्त्वाचे म्हणजे गुगलने जर आपले फिजिकल कार्ड लॉन्च केले तर ते थेट Apple Card शी स्पर्धा करू शकते. Apple Card भारतात नसले तरी गुगल सुरुवातीला फक्त अमेरिकेत आपले डेबिट कार्ड लाँच करेल.

गुगल पे भारतात खूपच लोकप्रिय आहे आणि कंपनी येथे काही डेडिकेटेड फीचर्सदेखील ऑफर करते. अशा वेळी उशीर झाला तरी कंपनीला त्याचे फिजिकल कार्ड भारतात लवकरच लाँच करतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment