आता आधार कार्ड हरवले असेल तर काळजी करण्याचे कारण नाही, ‘या’ आठ स्टेप्सनी मिळवू शकता ऑनलाईन प्रिंट 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकांसाठी सध्याच्या काळातले महत्वाचे कागदपत्र म्हणून गणले जाते. बहुतेक सर्वच ठिकाणी आधारकार्ड गरजेचे असते. सामन्यतः आधार कार्ड तयार करवून घेताना पत्ता, मोबाईल क्रमांक अशी माहिती द्यावी लागते. पण काहीवेळेला आपला मोबाईल क्रमांक आपण आधारला नोंदवत नाही. अशावेळी आधारकार्ड हरवले तर मोठी समस्या निर्माण होते. पण आता जर आधारकार्डला मोबाईल क्रमांक नोंद नसेल तरी आपण ऑनलाईन आधारची प्रिंट काढू शकणार आहोत. पुढील  पद्धतींनी आपण ते काढू शकणार आहोत.

सर्वात आधी आधारकार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. www.uidai.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आधार सेवा टॅबमध्ये ऑर्डर आधार रिप्रिंट असा पर्याय आहे त्यावर क्लिक करायचे आहे. यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. इथे आपला १२ अंकी आधार नंबर किंवा १६ अंकी व्हर्च्युअल आयडी टाकायचा आहे. याच्या खालच्या कॉलममध्ये सिक्युरिटी कोड टाकायचा. आता मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड वर टिक करायचे तिथे नवा नंबर देण्याचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून नवीन नंबर नोंदवायचा. यानंतर आपल्या मोबाईल वर ओटीपी नंबर येईल. त्या पर्यायात आधारची माहिती पाहणे आणि व्हेरिफाय करणे असा पर्याय नसेल.

वरील सर्व क्रिया झाल्या की नव्या नंबरवर आलेला ओटीपी नोंदवायचा. नियम व अटी वाचून सहमत वर क्लिक करायचे. पुन्हा स्क्रीनवर नवीन पेज उघडेल, जिथे ५० रु पेमेंट असा पर्याय येईल यावर क्लिक करून डेबिट, क्रेडिट कोणत्याही एका पर्यायाने पेमेंट करायचे. पेमेंट केल्यानंतर त्याची स्लिप येईल. जी डाऊनलोड करता येते. पेमेंट झाले की आधार कार्ड पुन्हा प्रिंट करण्यात येते. आणि १५ दिवसाच्या आत ते स्पीड पोस्टने आपल्या घरी देखील पोहोचते. त्यामुळे आता फार काळजी करण्याचे कारण राहिलेले नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment