नुपूर शर्मा- नवीन जिंदल प्रकरणात शोएब अख्तरने घेतली उडी, भारत सरकारला म्हणाला…

Shoaib Akhtar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नेता नवीन जिंदल यांची प्राथमिक सदस्यता पक्षाने रद्द केली आहे. तसंच या दोघांविरोधात एफआयआरदेखील दाखल केला आहे. भारत सरकारच्या या कारवाईचे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) कौतुक केले आहे.

https://twitter.com/shoaib100mph/status/1534952101905805315

काय म्हणाला शोएब अख्तर?
‘पैगंबर मोहम्मद यांचा सन्मान आमच्यासाठी सगळं काही आहे. आमचं जगणं मरणं आणि सगळं काही करणं फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे. आमच्या प्रिय पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत अपमानजनक शब्दांचा वापर करणाऱ्यांची मी तीव्र शब्दांमध्ये निंदा करतो. हे लाजिरवाणं वक्तव्य करणाऱ्या लोकांचं निलंबन केल्याबद्दल मी भारत सरकारचं स्वागत करतो. अशा लोकांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, ज्यामुळे पुन्हा असं कोणी करणार नाही, याची काळजी भारत सरकारने घ्यावी,’ असं शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

मोहम्मद पैगंबरांविरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. प्रयागराज, लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये नुपूर शर्माच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हे पण वाचा :
शिवसेनेच्या संजयचा पराभव

भारताला मोठा धक्का ! Mary Kom ची दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार

Car Safety Features : नवीन कार खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घ्या

उपचारासाठी चक्क पिल्लाला घेऊन रुग्णालयात पोहोचलं माकड

‘या’ तीन प्रकारच्या झाडांच्या पानांची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!